Riddhi Rangavali

रांगोळी हा महाराष्ट्रीय कलाप्रकार समजला जातो. प्रवेशदारापुढे, अंगणात, तुळशीवृंदावनासमोर विविध शुभचिन्हे रांगोळीच्या माध्यमातून रेखाटली जातात. या चिन्हांना विशिष्ट अर्थ असतात.

dot बिंदु : बिंदु बीजाचे प्रतीक आहे. बीजातच पुननिर्मितीचे गूढ सामावलेले आहे. म्हणूनच बिंदु मातेचे प्रतीक आहे.
Vartool वर्तुळ: वर्तुळ अथवा गोल हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे.
Kendravardhini केंद्रवर्धिनि : केंद्रवर्धिनि हे मूळ विचारांना व्रुधिन्गत करणार्‍या संवेदनेचे प्रतीक आहे
Gopadma गोपद्म : लक्ष्मी वसते गोपद्म्मे
Swastik स्वस्तिक : स्वस्तिक हे हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. स्वस्तिकाचा वापर जगभरातील संस्कृतींमध्ये देखील केला जातो.
Om :ॐ इत्येदक्षरं इदं सर्वं तस्योपव्याख्यानं, भूतं भवद् भविश्यद् इति सर्वं ओंकार एव, यच चान्यत त्रिकालातीतं तदप्योंकारमेव।
Shrii श्री :श्री हे लक्ष्मीचे एक नाव आहे. श्री म्हणजे समृद्धी, शक्ती. इतर अनेक देवांचा आदरपूर्व उल्लेख श्री असा करतात, विषेशतः गजाननाचा.शुभ पत्रांची सुरवात "।।श्री।।" नी करतात.
Vishnupada देवाची पावले : ईश्वरी संचाराचे प्रतीक आहे
Koeri कोयरि : कोयरि ही कलात्मकतेचे प्रतीक आहे
Tura तुरा : तुरा हे सुंदरतेचे प्रतीक आहे

  • सूर्य, चंद, शंख, गोपद्म, कमळ, स्वस्तिक, बेलपान, चांदणी, लक्ष्मीची पावले अशी ही चिन्हे निसर्गचक्र आणि सजीवसृष्टीची निदर्शक असतात.
  • पूर्वापार तसेच आजही कित्येक गावांमध्ये अश्वीन अष्टमीला, दिवाळीला आठ दिवस असताना भल्या पहाटे अंगणासमोर, आळीतील संपूर्ण रस्ता शुभसूचक रांगोळी काढतात. कडेला पाण्याची ओळ सांडून रांगोळीची रेघ ओढली जाते. कणीदार रांगोळीचा तसेच तांदळाच्या पिठीचा वापर करून वर उल्लेख केलेली चिन्हे तर काढली जातातच, पण कणगी आणि कणसाचीही चित्रे काढली जातात. या मोसमात धान तयार झालेले असते त्याचे ते निदर्शक आहे. दिवाळीची ही सुरुवात मानली जाते आणि त्याला 'आठवडी' असे काही ठिकाणी म्हटले जाते. पहाटे थाळी वाजवून आठवडीची द्वाही दिली जाते.
  • अशाच रेखाटनांतून पुढे ठिपक्यांची रांगोळी विकसित झाली. आठापासून वीसापर्यंतच्या ठिपक्यांच्या विविध आकाराच्या रांगोळ्या रेखाटणे आणि त्यात रंग भरणे ही कला आहे. वरवर सोपे वाटणारे हे रेखाटन सुबक पद्धतीने करणे किती कठीण आहे ते प्रत्यक्षात रांगोळी काढायला बसल्यावरच समजते.
  • महाराष्ट्रात तर रांगोळीसाठी अंगण आणि तुळशीवृंदावनही पुरेनासे झाल्यावर जेवणाच्या ताटाभोवती, पाटाभोवतीही बोटांचा कलात्मक वापर करून सजावटीची पद्धत रूढ झाली. सध्या संस्कारभारती रांगोळी लोकप्रिय आहे. गालिच्यासारख्या दिसणाऱ्या या रांगोळीचे अस्तित्व आता सार्वजनिक समारंभांत, उत्सवांच्या वेळी भर चौकांत, मांडवातही दिसू लागले आहे. चमकदार आणि उठावदार रंगांचा वापर हे या रांगोळीचे वैशिष्ट्य आहे.
  • बंगालमध्ये रांगोळीला अल्पना, बिहारमध्ये अरिपना, राजस्थानमध्ये मदना, गुजरातमध्ये रंगोली, महाराष्ट्र व कर्नाटकात रांगोळी, उत्तर प्रदेशात चौकपुराना, केरळ व तामीळनाडूत कोलम तर आंध्र प्रदेशात मुग्गू म्हणतात.
  • सर्वसाधारणपणे विशिष्ट प्रकारच्या दगडाची पांढरी कणीदार पूड रांगोळीसाठी वापरली जाते. अल्पना मात्र ओला सफेद रंग किंवा तांदळाच्या ओल्या पिठीच्या साह्याने काढतात.